मध्यंतरी एक विडिओ बराच व्हायरल झाला होता. मुंबईहून द्रुतगती मार्गाने पुण्याला जाताना खालापूर टोल नाक्यानंतर लागणाऱ्या मॉलमधील पुस्तकाच्या दालनाचा तो व्हिडिओ होता.
त्या व्हीडिओमध्ये मराठी मालिकेतील एक अभिनेते श्री मिलिंद गवळी या मॉलमधील
पुस्तकाच्या दालनासंबंधीची माहिती सांगून, असे आवाहन करीत होते की पुण्याला
जाणाऱ्या लोकांनी आवर्जून या पुस्तक दालनाला भेट द्यावी. असे सांगताना ते त्यांच्या हातातील
चार पुस्तके दाखवत होते आणि त्यात मी अनुवादित केलेले “आर्ट ऑफ वोर “ हे पुस्तक
होते. तो व्हिडिओ माझ्याही पाहण्यात आला होता.
आता परवा ९ डिसेंबरला मी माझ्या मुळीसह पुण्याला जाताना त्या मॉलमध्ये
गेलो आणि मी लगेच व्हीडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या पुस्तक दालनात गेलो. पूर्वी मी
फक्त जिन्याच्या बाजूला असलेली पुस्तके चाळत असे पण या वेळेस वरच्या मजल्यावर
गेलो. तिथे असंख्य पुस्तके होती ती. सर्व पुस्तके बघून झाल्यावर खाली आलो आणि तिथे
पुस्तके विक्री करत असलेल्या गृहस्थांची +वीरेन्द्र
गुप्ता यांची ओळख करून घेतली. गुप्ताजी केवळ पुस्तक विक्रेते नाहीत तर ते पुस्तकप्रेमीही
आहेत आणि अनेक पुस्तकांची माहिती त्यांना
आहे. मी व्हीडिओमाधील पुस्तकाचा अनुवादक आहे असे कळल्यावर त्यांनी अत्यंत आदराने मला बसावयास
सांगितले. माझ्या अन्य पुस्तकांची चौकशी केली . निघताना मी गुप्ताजींबरोबर
फोटो घ्यावा अशी विनंती केली तर त्यांनी
मला श्रीमंद भागवद्गीतेची प्रत भेट देताना फोटो काढावा असे सुचवले आणि तो फोटो
घेतला गेला.
मित्रांनो, आपण अनेकदा जेव्हा कधी पुण्यास
जाल तेव्हा आवर्जून या मॉलमधील पुस्तक दालणाला
भेआवर्जून आणि पुस्तकपरेमी असलेल्या श्री वीरेन्द्र
गुप्ता यांनाही भेटा.

No comments:
Post a Comment